मुंबई : उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला सोमवारी रात्री (19 जुलै 2021) अश्लील चित्रपट निर्मिती आणि त्याचे काही अॅप्सवरून प्रकाशित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पोलीस आयुक्तांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 'फेब्रुवारी 2021 मध्ये गुन्हे शाखा मुंबईने अश्लील चित्रपट तयार करणे आणि काही अ‍ॅप्सच्या माध्यमातून प्रकाशित करण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आम्ही राज कुंद्रा यांना 19 जुलै रोजी अटक केली आहे. कारण ते यामागचे प्रमुख व्यक्ती असल्याचं समोर येत आहे. आमच्याकडे यासंदर्भात पुरेसे पुरावे आहेत. चौकशी सुरू आहे.'



गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा हा प्रदीप बक्षीचा नातेवाईक असून तो यूकेमध्ये राहतो. त्याच्याकडे केनरीन प्रॉडक्शन हाऊस नावाची युके आधारित कंपनी आहे. प्रदीप बक्षी हे त्यांचे नातेवाईक आणि या कंपनीचे अध्यक्ष याशिवाय राज कुंद्राचा व्यवसाय भागीदार आहेत.


कुंद्रा आणि बक्षी यांच्यातील स्फोटक व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून पैशांची देवाण-घेवाण कशी झाली आणि अश्लील कंटेटद्वारे अँडवान्स रक्कम कशी मिळवली गेली. हे दोघांच्या संभाषणात समोर आलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरचं ग्रुप चॅट पोलिसांच्या हाती लागलं आहे.



राज कुंद्रा यांचे माजी पीए (वैयक्तिक सहाय्यक) उमेश कामत यांनी भारतात केनरीन प्रॉडक्शन हाऊसचे प्रतिनिधी म्हणून काम केले होते आणि ही कंपनी पॉर्न फिल्मसाठी कित्येक एजंटांना कंत्राट देत होती आणि त्यासाठी अर्थसहाय्य करते.


वादग्रस्त मॉडेल-अभिनेत्री गहना वशिष्ठ आणि उमेश कामत यांनी केनरीन प्रॉडक्शन हाऊससाठी अश्लील चित्रपट बनवले. वेगवेगळ्या प्रकारचे अश्लील चित्रपट करण्यासाठी तीच कंपनी त्यांना अॅवडान्स पैसे देखील देत असे.



आगाऊ पैसे मिळाल्यानंतर गेहना आणि कामत अश्लील चित्रपट बनवण्याचं काम करत होते. ईमेल आयडीच्या माध्यमातून हा कंटेंट केनरीन प्रॉडक्शन हाऊसला पाठवला जात असे. त्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे पाठवले जात होते.


पोर्नोग्राफी प्रकरणातील तपासादरम्यान मुंबई क्राइम ब्रँचला अशीही माहिती मिळाली की देशभरातील वेगवेगळ्या एजंट्समार्फत पोर्न व्हिडिओ बनवणे आणि त्यांना पैसे पुरवणे यात केनरीन प्रॉडक्शन हाऊसचा सहभाग आहे.