मुंबई : राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या जातीय राजकारणाच्या आरोपानंतर मनसे राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर ट्विटरवरुन राज ठाकरेंवर टीका केली आहे. मिटकरींनी केलीली टीका मनसेला चांगलीच झोंबली आहे. मिटकरींच्या टिकेला मनसे सरचिटणीस संदीप देशपांडेंनीही टोला लगावला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरक्षण जातीच्या आधारवर नव्हे तर केवळ स्त्री-पुरूषाच्या आधारावर आरक्षण देण्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली आहे. मराठा आरक्षण देता येत नसेल तर स्पष्ट सांगा. केवळ तरुणांची माथी भडकवू नका अशी टीका त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलं आहे. आपण प्रबोधनकारही वाचलेत आणि यशवंतराव चव्हाणही वाचले असल्याचा टोला त्यांनी शरद पवारांना लगावला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर ट्विटरवरुन राज ठाकरेंवर टीका केली आहे. 



राज ठाकरे यांनी केली शरद पवारांवर केली होती टीका 


मी प्रबोधनकार ठाकरे वाचलेत आणि यशवंत राव चव्हणही वाचले. निवडणुकीत फक्त स्त्री आणि पुरुष हेच आरक्षण असलं पाहिजे. पुरंदरे हे इतिहास संशोधक आहेत. ते काय ब्राह्मण म्हणून तिथे जात होते का? डोकी भडकवण्याचा काम सुरू आहे. त्यासाठी एजंट नेमले गेले आहेत. बाबासाहेबांनी काय चुकीचं लिहिलं ते सांगा ना मग? असा सवाल राज ठाकरेंनी केला होता.