दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : 'झी मराठी दिशा' या आठवडापत्राच्या प्रकाशन कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकता ऐकता त्यांचे सुरेख व्यंगचित्र रेखाटले. 


मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंना विनंती...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे एकीकडे राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे व्यंगचित्र काढून पूर्ण केले आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच वेळी राज ठाकरेंना एक प्रेमाची विनंती केली. ही विनंती होती व्यंगचित्रात आपले पोट कमी दाखवण्याची.. पण ही विनंती येण्यापूर्वीच राज यांनी मुख्यमंत्र्यांचे पोट असलेले व्यंगचित्र काढून पूर्ण केलं होतं. 


स्मरणात राहील असा किस्सा... 


राज तुम्ही माझे कान लांब दाखवा, नाक मोठं दाखवा, मला टक्कल दाखवा पण माझं पोट मोठं काढू नका.. राज यांनी मुख्यमंत्र्यांचं पोट असलेलं व्यंगचित्र तर या विनंती आधीच पूर्ण केलं होतं. एकीकडे राज ठाकरे यांचं स्टेजवर बसल्याबसल्या काढलेलं व्यंगचित्र आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी राज यांना केलेली प्रेमळ विनंती हा क्षण झी मराठी दिशा आठवडापत्राच्या कार्यक्रमातील स्मरणात राहिल असा क्षण ठरला. 


राज विनंती मान्य करणार का? 


या कार्यक्रमातच झी मराठी दिशासाठी व्यंगचित्र काढण्याचं राज यांनी कबूल केलंय. पोट मोठं न काढण्याची मुख्यमंत्र्यांचा प्रेमळ विनंती राज ठाकरे यापुढे व्यंगचित्र काढताना मान्य करणार का हे बघावं लागेल.