मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १२वा वर्धापन दिन साजरा करण्यात आलाय. यावेळी राज यांनी मी तुमची वाट पाहतोय, आपण १८ तारखेला शिवतिर्थावर बोलू. मात्र, आपले भाषण सुरु असताना जे अधिकारी किंवा नेत्यांच्या दबावावरुन लाईट घालवतील त्यांना धडा शिकवा, अशा थेट इशारा राज यांनी यावेळी दिला.


मी वाट पाहतोय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मला जे काही बोलायचे ते मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात बोलणार आहे. तुम्ही सर्वजण याल, मी वाट पाहतोय. काही मिनिटे आधीच या, असे आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केले.  मनसेच्या १२ व्या वर्धापन दिनाचा सोहळा वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.


माझे भाषण सुरु झाले की...


गुढीपाडव्याला मेळावा होणार आहे. मात्र, तुम्ही घरी मेणबत्ता आणून ठेवा. अनेक वेळा माझे भाषण सुरु झाले की, लाईट बंद केल्या जातात. मी तुम्हाला आताच सांगतोय. आपआपल्या भागातील वीज अधिकाऱ्यांची भेट घ्या. त्यांना याची कल्पना द्या. जर लाईट गेली तर याद राखा. सभेच्या दिवशी वीज घालवणाऱ्यांना तुडवा, असा इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला.