देवेंद्र कोल्हटकर, झी २४ तास, मुंबई : कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सांत्वनपर वैयक्तिक पत्र पाठवून धीर देत आहेत. राज ठाकरे यांचे हे पत्र दादर-माहीम विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी या कुटूंबियांच्या घरी जाऊन देत राज ठाकरे या कठीण काळात या कुटूंबियांच्या पाठीशी उभे आहेत असा संदेश दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांचे पत्र....


आपल्या वडिलांच्या निधनाची दुःखद वार्ता समजली.अतिशय वाईट वाटले आपल्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे याची कल्पना मी करू शकतो.इतक्या प्रदीर्घ वर्षाचं कृपाछत्र क्षणार्धात अनंतात विलीन झाले.हा धक्का मोठा आहे.


परिस्थिती दुःखाची असली तरी या काळात खंबीर राहून आपण आरोग्याची काळजी घ्यावी.एकत्र राहून या महामारीतून पुढचा मार्ग काढावा.


आपल्या या दुःखद क्षणी मी, माझे कुटूंबीय आणि माझे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आपल्या सोबत आहोत आपल्या दुःखात सहभागी आहोत.आपल्या सर्वांना हे दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वर देवो हीच मनोमन प्रार्थना.


आपला नम्र,
राज ठाकरे


कोरोना काळात मनसे पदाधिकारी वैद्यकीय मदती पासून ते अन्नदाना पर्यन्त अनेक उपक्रम राबवत आहेत या काळात अनेकांना कोरोनाची लागण झाली त्यात त्यांनी जीवही गमावला आहे.कृष्ण कुंज वर ही विविध क्षेत्रातील लोक आपली गाऱ्हाणी घेऊन येत.


कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या मनसे पदाधिकारी यांनी स्वतःची व कुटूंबियांची काळजी घ्यावी यासाठी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे तसेच राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनीही मनसे पदाधिकऱ्यांना वैयक्तिक रित्या फोन करून विचारपूस केली होती.