मुंबई : Raj Thackeray MNS Activists meet in Mumbai:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सभांचा धडका लावला आहे. आता मुंबईत सभा होणार आहे. औरंगाबाद, ठाणे, पुणे येथील सभेनंतर आता मुंबईत वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात दुपारी 3 वाजता पदाधिकारी मेळावा होणार आहे. त्यामुळे आता राज ठाकरे आता काय बोलणार याची उत्सुकता आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मुंबई, ठाणे नंतर औरंगाबाद आणि पुण्यातील सभेत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच राज ठाकरे यांचे टार्गेट राहिले आहेत. पुण्यातील सभेत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल चढवला होता. 


राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली. एकदाचे काय ते होऊनच जाऊ दे, अशी त्यांची भूमिका आहे. पुण्यातील सभेतही त्यांना याबाबत पुनउच्चार केला. दरम्यान, राज यांच्या टिकेनंतर महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) आणि पर्यायाने शिवसेनेची चांगलीच कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता राज ठाकरे यांची पुण्यानंतर मुंबईत पुन्हा तोफ धडाडणार आहे.