मुंबई : फेरीवाल्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांची राज ठाकरेंनी भेट घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली. यावेळी त्यांच्या सोबत अमित ठाकरे देखील होते.


मालाड इथे फेरिवाल्यांच्या मारहाणीत सुशांत माळवदे गंभीर जखमी झालेत. फेरीवाल्यांना हटविण्यासाठी गेलेल्या सुशांत यांच्यासह ४ ते ५ कार्यकर्त्यांवर फेरिवाल्यांनी जीवघेणा हल्ला केला होता.


माळवदे यांच्यावर लोखंडी रॉडनं हल्ला केला यात माळवदे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या कांदिवलीतल्या ऑस्कर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.



तर तिकडे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन मनसेवर गंभीर आरोप केले आहेत.


संजय निरुपम पत्रकार परिषद मुद्दे:


  • विनापरवानगी मोर्चा काढून प्रक्षोभक भाषण करणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, पण गृहखाते पाहणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने माझ्यावर मात्र गुन्हा दाखल होतो

  • मनसेचे नेते फेरीवाल्यांकडून हफ्ते घेतात, योग्यवेळी नावे जाहीर करेल

  • माझे लोकांना आवाहन आहे की मनसेची गुंडगिरी संपवण्याची हीच योग्य वेळ आहे 

  • नितेश राणे कुठल्या पक्षात आहेत हे आधी त्यांनी ठरवावं. मी लहान मुलांच्या आरोपांकडे लक्ष देत नाही

  • मी फेरीवाल्यांकडून हफ्ता घेतो हे कुणी पुराव्यानिशी सिद्ध केल्यास मी राजकारण सोडून देईन

  • मोकळे पदपथ हा नागरिकांचा हक्क, पण रोजीरोटीही तेवढीच महत्वाची

  • लोकांच्या हक्काचे मोकळे भूखंड शिवसेना-भाजपने लाटले

  • द्वेष, आणि हिंसाचाराच्या राजकरणामुळे लोकांनी मनसेला नाकारलं. पक्ष रिकामी झाला हे राज ठाकरे यांनी आता तरी लक्षात घ्यावं

  • जखमी मनसे कार्यकर्त्याची प्रकृती लवकरात सुधारावी ही ईश्वर चरणी प्रार्थना, पण त्या कार्यकर्त्याना देव सुबुद्धिही देवो

  • मुंबईत एकही फेरीवाला अनधिकृत नाही. कायदा बनलाय. पण सरकारला त्याला मंजुरी द्यायची नाहिये. फेरीवाल्यांवर होत असलेली कारवाई चुकीची असल्या प्रकरणी ११२ प्रकरणे न्यायालयात सुरु आहेत. न्यायालयाने या कारवाईला स्थगिती दिली आहे. तरीही न्यायालयाचे आदेशा अवमान करीत महापालिकेची कारवाई सुरू आहे.