Raj Thackeray: मुंबईतील नेस्को ग्राउंडवर (nesco ground) मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा आयोजीत करण्यात आला. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray) चौफेर फटकेबाजी करत सर्वांचा समाचार घेतला. राज ठाकरे आज मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकणार असल्याची चर्चा होती. अशातच मनसेने  मुंबई महापालिका निवडणुकींसाठी राज ठाकरे (raj thackeray nesco center speech) यांनी रणशिंग फुकलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि राज्यपाल कोश्यारींवर टीकास्त्र देखील सोडलं. तसेच पक्षांनी खालच्या दर्जांचं राजकारण करू नये, असं सल्ला देखील राज ठाकरे यांनी भाजपसह इतर सर्वच पक्षांना दिलाय. त्यावेळी त्यांनी मुंबईतील गटाध्यक्षांना आश्वासन दिलं आणि तयारीला लागण्याच्या सुचना देखील केल्या आहेत.


काय म्हणाले राज ठाकरे?


मी राज ठाकरे तुम्हाला शब्द देतो, तुम्ही संपूर्ण ताकदीने उतरा... मी तुम्हाला मुंबई महापालिका तुमच्या हातात आणून देतो. काम सांगतो ते तुम्ही केलं पाहिजे. आपलं काम तुम्ही सर्वासमोर मांडलं पाहिजे. शाखाध्यक्ष काम करत नसेल तर माझ्यापर्यंत कळवा. माझी अपेक्षा तुमच्याकडून अपेक्षा एका अंकूशाची आहे, असंही राज ठाकरे (Raj Thackeray) यावेळी म्हणाले आहेत.


आणखी वाचा - Raj Thackeray: "आमचं धोतर म्हटलं नाही का? अरे... वय काय बोलतो काय?", राज ठाकरेंचा कोश्यारींना टोला!


दरम्यान, राज्यात (Maharastra Politics) आगामी काळात महत्त्वाच्या शहरांमध्ये महापालिका निवडणुकींचं बिगूल वाजण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये मुंबई महापालिकेचा (BMC) देखील समावेश आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुंबई गटाध्यक्षांचा मेळावा घेतला आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.