Raj Thackeray Exclusive : राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुलाखतीत विविध मुद्द्यांवर रोखठोक मत मांडली. या वेळी त्यांनी शिवरायांच्या काळातील काही गोष्टींना उजाळा दिला. राज ठाकरे यांनी मुलाखतीत बोलताना म्हटले की, काही वर्षांपूर्वी मी बेडेकर साहेबांना भेटलो होतो. तेव्हा त्यांनी काही शब्दांचा अर्थ सांगितला होता. (Raj Thackeray told meaning of Fadanvis name)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितले की, 'युद्ध लढाया परिचित तर आहे. पण माझी भूमी ही स्वतंत्र आहे. ही हिंद भूमी माझी आहे. त्यामुळे भाषा पण माझी पण असली पाहिजे. म्हणून त्यांनी मराठीभाषा शब्दकोष काढला. त्यांनी स्वत:ची नाणी काढली. हे दंतकथा सारख्या वाटतात. लढाया सोबत इतर गोष्टी करणं. संस्कृतवर इतकं प्रेम.'


'पारसनीस म्हणजे काय पारशियन लिहिणारा, नवीस म्हणजे लिहिणारा. चिटनवीस म्हणजे चिठ्ठी लिहिणारा, तो चिटनीस. फडणवीस म्हणजे फळ्यावरती लिहिणारा. फड म्हणजे फळा.'


राज ठाकरे यांनी हरहर महादेव या चित्रपटात व्हाईस ओव्हर दिला आहे. त्या निमित्ताने सहकलाकार म्हणून त्यांची मुलाखत घेण्यात आली.


दिवाळीच्या दिवशी म्हणजेच 25 ऑक्टोबर 2022 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. 'हर हर महादेव' (Har har Mahadev Movie) हा सिनेमा मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नड या 5 भाषांमध्ये रिलीज होणार आहे.