COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत आज रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची फिरकी घेण्याची संधी सोडली नाही. राज ठाकरे यांनी एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितलं की, रेल्वेमंत्री 'पियुष गोयल' यांच्यापेक्षाही मला 'प्रकाश' आणि 'आस्वाद'चा पियुष चांगला वाटतो.


या बातमीत वरील व्हिडीओ हा प्रकाश रेस्टॉरंटचा आहे, जेथे राज ठाकरेंना चांगले वाटणारे पियुष मिळते. दादरमधील आस्वाद आणि तांबे आरोग्य भुवन देखील आस्वादसाठी प्रसिद्ध आहे.


राज ठाकरे यांनी  'प्रकाश' आणि 'आस्वाद'चा पियुष चांगला म्हटल्यानंतर सर्व पत्रकार खळखळून हसले, 'प्रकाश' आणि 'आस्वाद' हे मुंबईच्या दादरमधील मराठी खाद्यपदार्थ मिळणारे रेस्टॉरंट आहेत. तर पियुष हा एक गोड मराठी पेय आहे. हे सांगण्याचंही एक कारण आहे, कारण महाराष्ट्रात सर्वत्र पियुष हे पेय ओळखीचे नाहीय. पण मुंबई पुण्यात पियुषचे चाहते तुम्हाला हमखास मिळतील.