Toll Free Mumbai Light Vehicles : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजणार आहे. अशात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार अशी शक्यता असल्याने शिंदे सरकारने घोषणांचा सपाटा लावलाय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने मोठी घोषणा केलीय. मुंबईतील एन्ट्री पॉइण्टवरील 5 टोल नाक्यांवर आज रात्री 12 वाजेपासून हलक्या वाहनांना टोल द्यायचा नाहीय. मुंबईकर अखेर टोलमुक्त झाली आहे. अनेक वर्षांपासून मुंबई टोलमुक्त करण्यासाठी मनसे आणि राज ठाकरे यांनी अनेक आंदोलन केलं. आज त्यांच्या लढाला यश आल्याची पहिली प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिलीय. (raj thackeray reaction on mumbai toll free for cars decision is up to the election)


'निर्णय निवडणुकीपुरता...'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर आज मध्यरात्रीपासून हलक्या वाहनांना टोलमुक्ती मिळणार आहे. याबद्दल एमएमआर परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांचे अभिनंदन आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांचा खूप खूप अभिनंदन. 


टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी, आणि जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल झालेत, तिथले रस्ते टोलमुक्त झाले पाहिजेत या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला... आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली यावरून आमच्यावर टीका झाली, पण सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही. 


हेसुद्धा वाचा - सर्वसामान्यांना सरकारचा मोठा दिलासा! मुंबईच्या 5 टोल नाक्यांवर टोलमाफी; 'या' तारखेपासून अंमलबजावणी


पण असो... किमान मुंबईकर टोलमुक्त झाला आणि आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब. यासाठी राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन, पण फक्त हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी. 
 
आज मुंबई टोलमुक्त झाली पण त्या आधी किती लोकांनी टोलच्या या खेळात, संपत्तीच्या राशी उभ्या केल्या याचा हिशोबच नाही. खरंतर याची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. पण ती होईल याची फारशी खात्री नाही, कारण कोणी कोणाला पकडायचं हा प्रश्न आहे. पण ठीक आहे, मुंबईकर टोलच्या ओझ्यातून मुक्त झाले हे बरे झाले. 


महाराष्ट्र सैनिकांनो, यापुढे 'टोलच्या आंदोलनाचं काय झालं?' असं कोणी विचारलं तर त्यांना मुंबई टोलमुक्तीचं उदाहरण अभिमानाने सांगा आणि तुम्ही एकदा ठरवलंत की गोष्ट तडीस नेता हे पुन्हा एकदा दिसलं हे विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन. या शब्दात त्यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.