मुंबई : Raj Thackeray Sharing Balasaheb Thackeray video :राज्यभरात सगळीकडे शांतता दिसून येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात आहे. कुठेही तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये याची खबरदारी राज्य सरकारने आणि पोलिसांनी घेतलेली दिसून येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याविरुद्ध हनुमान चालीसा पठण आंदोलन पुकारले आहे. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. वाशिम, नेरुळमध्ये अजान सुरू असताना हनुमान चालिसेचं पठण केले. तसेच यावेळी जय श्रीरामच्याही घोषणा दिल्या. दरम्यान, पोलिसांकडून मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजवल्यानंतर आता बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ पोस्ट करत शिवसेनेला डिवचलं आहे. आता या व्हिडिओचीच सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर आज राज्यभरात अजान विरुद्ध हनुमान चालिसाचे आंदोलन सुरु झाले आहे. राज्यातील अनेक भागातील मशिंदींवरील अजानचा आवाज अत्यंत कमी होता. त्यामुळे मनसैनिकांनी मुस्लीम बांधवांचे आभार मानले. तर काही भागात भोंग्यावरील अजान विरुद्ध मनसैनिकांनी हनुमान चालिसा पठण केलं. त्यामुळे पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतले आहे. त्याचवेळी आता राज ठाकरे यांनी शिवसेनेला डिवचण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांची भोग्याविरोधात असलेल्या भूमिकेचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.


ज्यावेळी माझे सरकार येईल त्या दिवशी रस्त्यावरील नमाज पठण बंद केलं जाईल. जर आमच्या हिंदूकडून काही त्रास होत असेल तर मला येऊन भेटा. कारण धर्मापेक्षा राष्ट्रवाद हा मोठा आहे. मशिदीवरील अनधिकृत भोंगे आणि रस्त्यावरील पठण बंद केले पाहिजे, असे बाळासाहेब यांनी स्पष्ट केले. कोणताही धर्म राष्ट्रहितासाठी आड येता कामा नये, लोकांना त्रास होता कामा नये, हिंदू धर्म जर कोणाला त्रास देत असेल तर मला सांगा मी त्याचा बंदोबस्त करायला तयार आहे, असं बाळासाहेबांनी म्हटले आहे.


भोंगे, अजान यावरून राज ठाकरे यांनी आज पुन्हा शिवसेनेला डिवचलं. राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा एक व्हिडिओ ट्वीट केला. धर्म विकासाचा आड येता कामा नये, मशिदीवरचे लाऊडस्पिकर खाली येतील, रस्त्यावरचे नमाज बंद होतील असं बाळासाहेबांनी त्या भाषणात म्हटलं होतं. बाळासाहेबांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्वीट करून राज ठाकरे यांनी शिवसेनेला बाळासाहेबांच्या भाषणाची आठवण करुन दिली. बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न कधी पूर्ण करणार, असा सवालच राज ठाकरेंनी हा व्हिडिओ ट्वीट करून विचारला आहे. 



मुंबईमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून आज पहाटे चार वाजल्यापासून संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भांडुपच्या एलबीएस मार्गावर असलेल्या सोनापूर परिसरातील जामा मस्जिद बाहेर कडेकोट पोलीस तैनात करण्यात आला आहे. स्वतः सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी देखील पहाटेपासून शहरांतील वातावरणाचा अंदाज घेत आहेत. दरम्यान आज पहिली अजानही अनेक मशिदींमध्ये लाऊडस्पीकर विनाच देण्यात आली.