मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (  Raj Thackeray ) यांनी मस्जिदीवरील भोंगे उतरवावेच लागतील. ३ मे पर्यंत वाट पाहून अन्यथा.. असा खणखणीत इशाराही त्यांनी दिला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचे देशभरात स्वागत करण्यात आले. हनुमान जयंतीच्या दिवशी देशभरात भोंगे लावून त्यावर हनुमान चालीसा लावण्यात आली.


भोंगे आणि हनुमान चालीसा यावरून महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. तर, दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व मशिदीवरील भोंगे उतरविण्याचा निर्णय घेत त्याची अंलबजावणीही केलीय.  


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या या निणर्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वागत केलंय. राज ठाकरे यांनी याबाबत ट्विट केले आहे.



उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषतः मशिदीवरील भोंगे उतरविल्याबद्दल योगी सरकारचे मनपूर्वक आभार असे ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे.


आमच्याकडे महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी'! अशी टीकाही राज यांनी ठाकरे सरकारवर केलीय.


महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना अशी राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.