Raj Thackeray Warns Government Over Mahim Construction: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईमधील दादार येथील शिवाजीपार्कमध्ये झालेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये माहीमच्या समुद्रामध्ये दुसरं हाजीआली उभारण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला. राज ठाकरे यांनी माहीमच्या समुद्रामधील ड्रोन फुटेज दाखवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे. "सरकारचं आणि प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यावर काय होतं ते आता बघूया..." असं म्हणत राज ठाकरेंनी माहीमच्या समुद्रामधील अनधिकृत बांधकामाचे ड्रोन फुटेजही दाखवले.


2 वर्षांपूर्वी इथं काहीच नव्हतं...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"माहीमच्या मगदूम बाबा दर्ग्याच्या इकडे समुद्रात हे अनधिकृत बांधकाम केलं. 2 वर्षांपूर्वी हे काहीच नव्हतं. इथे नवीन हाजीअली तयार करणं सुरु आहे. महीम पोलीस स्टेशन तिथे जवळ आहे. पण त्यांनी दुर्लक्ष केलं. महानगरपालिकेचे लोक फिरत असतात त्यांचं लक्ष नाही. दिवसाढवळ्या हे सुरु आहे, आणि तरीही पोलीस, महापालिका ह्यांना दिसलं नाही?" असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. "माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री/गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर ह्यांना विनंती आहे की हे पाहिल्यावर तात्काळ कारवाई करा, हे अनधिकृत बांधकाम तोडा. एका महिन्याचा अल्टीमेटम देतोय. नाहीतर त्याच्याबाजूला सर्वात मोठं गणपतीचं मंदिर उभं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जे होईल ते होईल," असं म्हणत राज यांनी थेट प्रशासनाला आव्हान दिलं आहे. 



मुस्लिमांना तरी हे मान्य आहे का?


"कोणाला सवलती देत बसाला आहात? दुर्लक्ष करत असाल तर आमच्याकडे पण करा. एकदा राज्य हातात आलं तर राज्य सुतासारखं सरळ करुन ठेवले. परत कोणाची हिंमत होणार नाही नजर उठवायची. कोणीही यावं आणि टपली मारुन दावं. तुमच्या डोळ्यादेखत व्हावं आणि तुम्ही राजकारण करातय.देशातील राज्यघटना मानणाऱ्या मुसलमानांना मला विचारायचं आहे की, हे तुम्हाला मान्य आहे का? आम्हाला ताकद दाखवण्याची इच्छा नाही पण गरज पडली तर ताकद दाखवायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही. महाराष्ट्रातील मुस्लीम समाजाला हे मान्य आहे का
कुठला आणि कसला दर्गा आहे हा? कोणाची समाधी आहे ती माशाची? राज्य आणि राज्यकर्ते दुसऱ्या गोष्टीत असतात तेव्हा काय घडतं हे मुद्दाम दाखवलं," असं राज ठाकरे म्हणाले. 



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यावर त्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची पसरलेली कबर पुन्हा जागेवर आणली. ह्याबद्दल सरकारचं अभिनंदन, असं राज म्हणाले. "एकनाथ शिंदेकडे आता शिवसेना हे नाव आलं, जो विचार बाळासाहेबांचा विचार आहे. माझी एकनाथ शिंदेंना विनंती आहे की मशिदींवरच्या भोंग्यावरच्या आंदोलनाच्या वेळी मागच्या सरकारने माझ्या 17000 महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल केलेत, ते गुन्हे मागे घ्या," असंही राज यांनी भाषणामध्ये म्हटलं. एकनाथ शिंदेंना माझं आवाहन आहे की आता तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही आता मशिदींवरचे भोंगे उतरवा. तुम्हाला जमणार नसेल तर आमच्या कृतींकडे दुर्लक्ष करा. मशिदींवरचे भोंगे आम्ही उतरवून दाखवू, असंही राज म्हणाले.