मुंबई : Raj Thackeray On Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या महाराष्ट्रबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर चहुबाजुनी टीका होत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडक शब्दात इशारा दिला आहे. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो आहे, असे स्पष्टपणे बजावले आहे. त्यामुळे आता राज्यपाल महाराष्ट्राची माफी मागणार का, याकडे लक्ष लागले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहिती नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचे पद आहे म्हणून आपल्याविरोधात बोलायला लोक कचरतात. परंतु आपल्या विधानांनी माहाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जात आहेत, हे लक्षात घ्या असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.



महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करुन ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? आदी सवाल राज यांनी इशारा देताना उपस्थित केले आहेत.


उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करु नका. तुम्ही हे का बोलताय, हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो, असा थेट इशारा राज यांनी दिला आहे. त्यामुळे मनसेची भूमिका आता स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.