मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अधिकृत फेसबुक पेजचं अनावरण करण्यात आलंय. रवींद्र नाट्य मंदिरातील सोहळ्यात पेज लाँचिंग झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटस्थापनेचा मुहूर्त साधत राज यांनी आपलं अधिकृत फेसबुक पेज सुरु केलंय. रविंद्र नाट्यमंदिरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. माहित नसलेल्या गोष्टी, पक्षाची धोरणं लोकांना कळावीत असं या फेसबुक पेजचा उद्देश असल्याचे राज यांनी सांगितले आहे.


लाँच झाल्यानंतर राज ठाकरेंनी भाषणही केलं. या भाषणादरम्यान त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. मराठी भाषा, सत्ताधाऱ्यांचा सोशल मीडियाचा वापर, सत्ताधाऱ्यांची पुढील निवडणुकीची रणनीती, बुलेट ट्रेन या मुद्द्यांवरुन त्यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. 


दरम्यान, त्यांनी दाऊदबाबतही मोठा गौप्यस्फोट यावेळी केला. दाऊदला भारतात यायचयं. त्यासाठी त्याच्यात आणि केंद्र सरकारमध्ये सेटिंग सुरु आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.