मुंबई : पक्षाच्या पुर्नबांधणीसाठी राज ठाकरे यांनी आता कवायत सुरू केलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजपासून मुंबईत विभाग निहाय बैठकांना सुरुवात झालीय. राज ठाकरेंनी मलबारहिल विधानसभा मतदार संघातल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 


त्यानंतर वरळीतल्या कार्यकर्त्यांशी राज संवाद साधणार आहेत. महापालिका निवडणुकीमध्ये मनसेचा पुरता धुव्वा उडाला होता. त्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत.