मुंबई : ज्या समाजमाध्यमांनी नरेंद्र मोदींना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं, इतकंच नव्हे तर देशाच्या पंतप्रधान पदीही विराजमान केलं तेच माध्यम आज त्यांच्यावरच उलटल्याचं मार्मिक भाष्य मनसे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी केलंय... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऱाज यांनी आपल्या फेसबुक पेजवर नवं व्यंगचित्र पोस्ट केलंय...ज्यात मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि या दोघांचे निकटवर्तीय केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय..


फेसबुक पेजच्या माध्यमातून राज ठाकरे विविध विषयांवर आपली भूमिका सातत्यानं मांडताना दिसताहेत...तसेच त्या भूमिकांवर लोकांच्या प्रतिक्रियांचे पडसादही उमटताहेत...