मुंबई : मनसे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर स्वतः रेखाटलेले व्यंगचित्र पोस्ट केलंय. घटस्थापनेच्या दिवशी या फेसबुक पेजचे अनावरण करण्यात आलं होतं. त्यावेळी केलेल्या भाषणात कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमबाबत केलेलं राजकीय विधान त्यांनी आज या व्यंगचित्रातून अधिक स्पष्ट केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दाऊद आजारी असून त्याला भारतात परत यायचं आहे, पण त्याला आपणच भारतात आणलं असं दाखवून भाजप प्रणित केंद्र सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांचं श्रेय लाटण्याच्या प्रयत्न सुरु केल्याचा सनसनाटी आरोप ठाकरे यांनी केला होता. 


ठाकरेंनी आता व्यंगचित्राच्या माध्यमातून आपला हा राजकीय आरोप लावून धरलाय. दाऊदच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फरफटत घेऊन येत असल्याचं या व्यंगचित्रात दाखविण्यात आलंय. ठाकरे यांनी या व्यंगचित्राला एक 'तर्क'चित्रं हे शीर्षक दिलंय.