मुंबई : उत्सवांचं सुरु असलेलं बाजारीकरण थांबवा, मग आयोजनांवर कुणीच हरकत घेणार नाही असा सल्ला वजा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दहीहंडी उत्सव समन्वय समितीला केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाकरे यांनी केलेली ही सूचना समन्वय समितीलाही पटलीय. त्यामुळे लवकरच समिती आपली अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे. उत्सवांमध्ये डीजे, लाऊडस्पीकर, सेलिब्रेटीज नको, पारंपारिक ढोल ताशाच्या गजरात दहीहंडी साजरी करा अशी भूमिका ठाकरे यांनी दहीहंडी उत्सव समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांपुढे मांडली. 


परंपरा जपण्यापेक्षा जे दहीहंडी आयोजक धांगडधिंगा करण्यास प्राधान्य देतात त्यांच्या दहीहंडया फोडू नका, असं आवाहन समन्वय समितीनं गोविंदा पथकांना करावं अशीही सूचना ठाकरे यांनी केली. 


समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांची आज सदिच्छा भेट घेऊन उत्सव आयोजनावर आलेले निर्बंध आणि न्यायालयात सुरु असलेल्या कायदेशीर लढाईची माहिती त्यांना दिली.