तुम्हाला माहितेय का? मुंबईच्या राजभवनाला 'देशातील राजभवनांची सम्राज्ञी' म्हणून ओळखले जाते. ही सम्राज्ञी गेल्या दिड शतकांपासून मुंबईतील इतिहासाची साक्षीदार आहे. मुंबईतील (Mumbai) अतिशय सुंदर वास्तूपैकी ती एक आहे. (Rajbhavan Tour Lets go for a walk in Raj Bhavan Tour in Mumbai nz)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई राजभवन हे महाराष्ट्राच्या राज्यपालांचे (Governor) अधिकृत निवासस्थान आणि कार्यालय आहे. राजभवन अंदाजे 50 एकर जमिनीवर वसलेले आहे व त्याच्या तीनही बाजूंना समुद्राने वेढलेले आहे. यावरुनच तुम्हाला त्या वास्तूची भव्यता आणि सौंदर्य लक्षात येईल.  


मुंबई राजभवन येथे सुंदर गालिचे, चित्रे, भन्नाट कोरीव काम केलेले दरवाजे आणि शोभिवंत फ्रेंच शैलीच्या खुर्च्या व सुंदर प्रतिमा असलेले सोफे यांचा मौल्यवान संग्रह आहे. राजभवनाला भेट देणाऱ्या अभ्यागतांना या इमारतींचा इतिहास (History) व येथे ठेवलेल्या काही वस्तूंबाबत नेहमीच उत्सुकता असते.



तुम्हाला राजभवनला भेट द्यायची आहे का?


1. तुम्ही ही राजभवनला भेट देऊ शकता त्यासाठी बुकिंग करणे आवश्यक आहे. तीन महिन्यांच्या पावसाळी अवकाशानंतर दिनांक 1 ऑक्टोबर 2022 पासून राजभवन भेटीची योजना पुन्हा सुरु होणार आहे.


2. या लिंकचा वापर करुन https://rbvisit.rajbhavan-maharashtra.gov.in/Login तुम्ही राजभवनच्या संकेतस्थळावर (website) यासाठी नोंदणी करु शकता.


3. राजभवन भेटीची वेळ सकाळी 6 ते सकाळी 8:30 ही असेल व प्रतिदिवशी 30 लोकांना भेट देता येईल. 


4. राजभवन हेरिटेज टूर (Raj Bhavan Heritage Tour) मध्ये सूर्योदय गॅलरी, देवी मंदिर, भूमिगत बंकर, क्रांतिकारकांचे दालन, दरबार हॉल, जलविहार सभागृह व महाराष्ट्र राज्य स्थापना स्मारक येथे भेट देता येईल.  


5. राजभवनात तुम्ही मंगळवार ते रविवार दरम्यान जाऊ शकतात


6. सोमवारी तसेच शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी राजभवन (Raj Bhavan) भेट बंद असेल असे राजभवनातर्फे कळवण्यात आले आहे. दिवाळीमुळे 22 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत भेट देता येणार नाही.  


मुंबईत राहणाऱ्यांनी या सुवर्ण संधीचा वापर करावा.  मुंबईतील दिड शतकांपासून साक्षीदार असलेल्या राजभवनांच्या सम्राज्ञीला जवळून पहा.