मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election 2022) आधी महाविकासआघाडीच्या चिंता आता आणखी वाढल्या आहेत. ईडीने दिलेल्या उत्तरामुळे महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मतदान करण्याकरिता मागितलेल्या परवानगीवर ईडीकडून उत्तर दाखल करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांना राज्यसभा निवडणुकीत मतदाना करिता परवानगीला ईडीने (ED) विरोध केला आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या कडून मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्टात 4 जून रोजी अर्ज  केला होता. ज्यावर उद्या सुनावणी होणार आहे.


राज्यसभा निवडणुकीसाठी एक-एक मताला महत्त्व आलं आहे. भाजप आणि महाविकासआघाडी यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. भाजपला 2 जागा मिळणं निश्चित आहे. पण भाजपने तिसरा उमेदवार दिल्याने महाविकासआघाडीच्य़ा चिंता वाढल्या आहेत.


राज्यात राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकासआघाडीने (Mahavikasaghadi) दगाफटका होऊ नये म्हणून आतापासूनच काळजी घेतली आहे. शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे. सहाव्या जागेसाठी भाजप विरुद्ध महाविकासआघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.


शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे 26 अतिरिक्त मते आहेत. आपल्या उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना 16 मतांची गरज आहे. तर भाजपाकडे 22 अतिरिक्त मतं असून अन्य 7 आमदारांचा पाठिंबा आहे. असे एकूण 29 मते त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे भाजपला ही 13 मतांची गरज आहे.