मुंबई : भारतीय शेअर बाजारात बिग बूल अशी ओळख असलेले राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचं निधन झालं आहे. झुनझुनवालांचं ब्रीच कॅंडी रुग्णालयात निधन झालं आहे. वयाच्या 62 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राकेश झुनझुनवाला यांचा जन्म 5 जुलै 1960 रोजी झाला. एका सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झालेल्या राकेश झुनझुनवाला यांनी रविवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण व्यापारी जगतामध्येच नाही तर बॉलिवूडमध्ये देखील शोककळा पसरली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राकेश झुनझुनवाला यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील हात आजमावला. झुनझुनवाला यांनी 'इंग्लिश विंग्लिश', 'शमिताभ' आणि 'की अँड का' यांसारख्या सिनेमांच्या निर्मिती जबाबदारी खांद्यावर घेतली. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी निर्मित केलेल्या सिनेमाला उत्तम यश देखील मिळालं.


राकेश झुनझुनवाला यांनी 2012 साली प्रदर्शित झालेल्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी स्टारर 'इंग्लिश-विंग्लिश' सिनेमाची निर्मिती केली. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर  जवळपास 102 कोटींचा व्यवसाय केला.  'इंग्लिश-विंग्लिश' नंतर राकेश झुनझुनवाला यांनी  'शमिताभ' आणि 'की अँड का'ची निर्मितीही केली.


शेअर मार्केटमध्ये यश मिळवल्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये हात आजमावला आणि ते यशस्वीही झाले. यावरून असे दिसून येते की त्याने ज्याला स्पर्श केला. ते त्याचे सोने करायचे. अलीकडेच त्यांनी आकासा विमानसेवा सुरू करून स्वस्त विमान प्रवासाचे आश्वासन दिले.


अलीकडेच त्यांनी आकासा विमानसेवा सुरू करून स्वस्त विमान प्रवासाचे आश्वासन दिले. राकेश झुनझुनवाला यांनी Akasa Air या नवीन विमान कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती आणि 7 ऑगस्टपासून कंपनीचं काम सुरू झालं.