Rakhi Sawant Car Challan: वाहतूक नियमांची पायमल्ली केलेल्यांना दंड भरावा लागतोच. मग ती व्यक्ती कुणीही असो. पोलीस आणि सीसीटीव्हीच्या नजरेतून सुटत नाही. अभिनेत्री राखी सावंत कायमच लूक आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असते. मात्र आता तिला वाहतूक नियमांची पायमल्ली केल्याने दंड भरावा लागला आहे. राखी सावंत हीने वाहतूक नियमांची पायमल्ली करत गाडी रस्त्यात पार्क केली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र इतकं होऊनही तिला त्याचं काही वाटलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री राखी सावंत गाडीजवळ येताच वाहतूककोंडीकडे बघत म्हणाली, "मी जिथे उभे राहते रांग तिथून सुरु होते. जरा थांबा". इतकं बोलल्यानंतर कारमध्ये बसते आणि तेथून निघून जाते. राखी सावंतच्या या वर्तणुकीनंतर अंधेरी लोखंडवाला रेसिडेंस असोसिएशने कारवाईची मागणी केली होती. असोसिएशननं ट्वीट करून म्हटलं की 'हे कसलं वागणं? कायद्याच्या दृष्टीने सर्व समान आहेत, असे आम्हाला वाटते. ट्राफिक जाम करणाऱ्या या महिलेवर कारवाई करणे आवश्यक आहे असे तुम्हाला वाटत नाही का? चालन कुठे आहे?'



या ट्वीटनंतर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. ओशिवरा वाहतूक पोलिसांनी राखी सावंतच्या गाडीचे ई-चलान पाठवलं आहे. मात्र, त्या गाडीची मालकी राखी सावंत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.