मुंबई : 'काही गोविंद पथक महाराष्ट्राच्या सरकराला त्यांच्या मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. एसी रूममधून सांगणार असाल दहीहंडी साजरी करायची नाही तर हिंदू बांधव ऐकणार नाही. आम्ही दहीहंडी करणार म्हणजे करणारचं...' अशी ठाम भूमिका भाजप प्रवक्ते राम कदम यांनी घेतली आहे. सध्या सर्वत्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत देण्यात येत आहेत. अशात दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री महाराष्ट्रातील गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करत आहेत. 
 
राम कदम म्हणाले, 'काही गोविंद पथक महाराष्ट्राच्या सरकराला त्यांच्या मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी सर्व गोविंदा पथकांची इच्छा आहे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा व्हावा. यावर्षीची हंडी या हिंदू  विरोधी सरकारने रोखली तरी आम्ही थांबणार नाही. आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारचं. हा हिंदूंचा उत्सव आहे.' असं कदम म्हणाले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ते पुढे म्हणाले, 'जेव्हा हिंदूंचे उत्सव येतात तेव्हा आम्हाला सल्ले आणि इतरांचे सण येतात त्यांना परवानगी. हा दुटप्पी न्याय कसा? बियर बार, दारूची दुकान उघडताना त्यांना प्रोटोकॉल, नियम तयार करता. तसे कोणते नियम तयार करणार असाल तर आम्ही त्या नियमांचं स्वागत करू.पण तुम्ही नियम बनवणार नसाल आणि एसी रूममधून सांगणार असाल दहीहंडी साजरी करायची नाही तर हिंदू बांधव ऐकणार नाही. आम्ही दहीहंडी करणार म्हणजे करणारचं...' 


महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत आहेत.