राम कदम या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर ट्रोल
आमदार राम कदम पुन्हा एकदा चर्चेत
मुंबई : काही दिवसांपूर्वी वादात सापडलेले भाजप आमदार राम कदम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दहीहंडी दरम्यान महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे ते चांगलेच वादात सापडले होते. पण आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर ते चांगलेच ट्रोल झाले आहेत.
दिवाळी दरम्यान राम कदम यांनी सुरक्षारक्षकांना ओडोमसचं वाटप केलं. हा व्हिडिओ त्यांना सोशल मीडियावर टाकल्याने अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. राम कदम प्रसिद्धीसाठीच हे सगळं करत असल्याचं लोकांनी म्हटलं आहे.
राम कदम हे घाटकोपरमधून भाजपचे आमदार आहेत. त्यांची दहीहंडी ही नेहमीच चर्चेत असते. पण यंदा मात्र त्यांच्या दहीहंडीला त्यांच्या एका वक्तव्याने चांगलाच वादात आणलं होतं. हळूहळू हा वाद मिटला असला तरी राम कदम यांच्यावरचा लोकांचा राग अजून कमी झालेला दिसत नाहीये.