Amitabh Bachchan यांनी अयोध्येत खरेदी केला मुंबईपेक्षाही महगडा प्लॉट, 15 मिनिटावर राम मंदिर
Amitabh Bachchan यांनी अयोघ्येत 10 हजार स्केअर फूटची जमीन खरेदी केली आहे. या जमिनीची किंमत मुंबईतल्या जमिनीपेक्षाकही कितीतरी पट अधिक असल्याचं सूत्रांचं म्हणणं अहे. अमिताभ बच्चन यांनी खरेदी केलेल्या जमिनीपासून राम मंदिर अवघ्या 15 मिनिटावर आहे.
Amitabh Bachchan Ayodhya: अयोध्येत येत्या 22 जानेवीरीला रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची सध्या देशभरात तयारी सुरु असून राष्ट्रीय सोहळ्याचं वातावरण आहे. ज्या दिवशी रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापणा केली जाईल त्या दिवशी देशाभरात दिवाळी साजरी केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहाणार आहेत. बॉलिवूड क्षेत्रातील अनेक कलाकारांना या सोहळ्याला उपस्थित राहाण्याची शक्यता आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. यादरम्यान अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत जमीन खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. या जमिनीची (Plot) किंमत मुंबईतल्या जमिनीपेक्षाही कितीतरी पटीने जास्त आहे.
एन्क्लेव 'द सरयू' मध्ये घेतला प्लॉट
हिंदुस्तान टाईमन्सने दिलेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन यांनी ही जमीन सेव्हन स्टार मल्टी पर्पज 'एन्क्लेव- द सरयू पार्क' (Enclave The Sarayu Park) इथं खरेदी केली आहे. या जमिनीची अधिकृत किंमत अद्याप समोर आलेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या जमिनीची किंमत 14.5 कोटी रुपये इतकी असून 10 हजार स्क्वेअर फूट इतकी ही जमीन आहे.
बिग बी प्रयागराजचे
अमिताभ बच्चन यांचा जन्म उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराज (Prayagraj) इथं झाला. प्रयागराजपासून अयोध्येचं अंतर केवळ 5 तास इतकं आहे. जमीन विक्री करणाऱ्या कंपनीचे अध्यक्ष अभिनंदन लोढा यांनी सरयूचे पहिले ग्राहक म्हणून अमिताभ बच्चन यांचं आम्ही स्वागत करतो असं म्हटलं आहे.
विमानतळापासून 30 मिनिटं दुरीवर
विशेष गोष्ट म्हणजे अमिताभ बच्चन यांनी जी जमीन खरेदी केली आहे, ती अयोध्या एअरपोर्टपासून अवघ्या 30 मिनिटावर आहे. तर 'द सरयू एन्क्लेव' राम मंदिरापासून 15 मिनिटावर आहे.
रामंदिराची भव्यता
अयोध्येतील नवनिर्मित राममंदिर 250 फिट लांब आणि 161 फूट उंच आहे. हे राम मंदिर जगातील तिसंर सर्वात मोटं राममंदिर आहे. मंदिराच्या प्रत्येक खांबावर नक्षीकाम करण्यात आलं आहे. 32 पायऱ्या चढल्यानंतर भाविकांना रामलल्लाचं दर्शन होणार आहे. मंदिराचं बांधकाम अशा प्रकारे करण्यात आलं आहे की 25 फुटावरुनही भाविकांना रामलल्लाचं दर्शन होणार आहे. मंदिराच्या भिंतीवर देवी-देवतांची चित्र साकारण्यात आली आहे. तर मंदिराला सोन्याचा दरवाजा बसवण्यात आल आहे. सोन्याच्या दरवाजाचं काम सुरु आहे. अयोध्येतलं राममंदिर तीन मजली असणार आहे.