मुंबई : देशभरात १० एप्रिलला रामनवमी ( Ramnavmi ) आणि १६ एप्रिलला हनुमान जयंती ( Hanuman jayanti ) मोठा उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र, या दरम्यान विविध राज्यात दंगे झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेएनयू परिसरात झालेली हाणामारी, जहांगीरपूरी येथे दंगे उसळले. राजस्थान, गुजरात, झारखंड, प.बंगाल आणि मध्य प्रदेशमध्ये दंगे झाले. या घटनांचा तपास एनआयएने करावा.


एकाचवेळी निरनिराळ्या राज्यात दंगे झाले. हा आंतरराष्ट्रीय कट आहे का? राष्ट्रविरोधी कारवाया केल्या जात आहेत का ? तसेच यामागे आंतरराष्ट्रीय संघटना आहेत का याचा तपास NIA कडे सोपवण्याची मागणी जनहित याचिकेतून सुप्रीम कोर्टात करण्यात आलीय. 


राजस्थान, गुजरात, झारखंड, प.बंगाल आणि मध्य प्रदेशात दंगे झाले. जेएनयू परिसरात हाणामारी झाली. जहांगीरपूरी येथे दंगे झाले, या सगळ्यांचा तपास एनआयएने करावा, असं या याचिकेत म्हणण्यात आलंय.


दरम्यान, मुंबईतही रामनवमी ते हनुमान जयंती या सहा दिवसांच्या काळात 4 ठिकाणी सामाजिक तणावच्या घटना घडल्या आहेत. मानखुर्द, मालवणी, गोरेगाव आणि कुरार येथे आत्तापर्यंत गुन्ह्यांची नोंद झालीय. 


मानखुर्द, मालवणी आणि कूरार येथे हिंदु - मुस्लिम वाद तर गोरेगाव (आरे) येथे दलित आणि सवर्ण वादाची घटना घडलीय. या चारही घटनांमध्ये आत्तापर्यंत एकूण 36 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आलीय. 


पोलिस प्रशासनाने संबंधितांवर कडक कारवाईचे आदेश दिले असून मुंबईत कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संवेदनशील भागावर पोलिस नजर ठेऊन आहेत.