उद्धव ठाकरे राममंदिराबाबत पुन्हा आक्रमक, भाजपविरोध कायम
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर निवडणुकीचे नगारे वाजवल्यानंतर आज पुन्हा राममंदिराबाबत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर निवडणुकीचे नगारे वाजवल्यानंतर आज पुन्हा राममंदिराबाबत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. कुंभकर्णाला जागं करण्यासाठी २४ डिसेंबरला पंढरपुरात सभा घेण्याची घोषणा करुन टाकली. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष कायम असल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत काल नगारे वाजवून त्यांचं कौतुक करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज रणशिंग फुंकले आहे. राममंदिराच्या मुद्यावर उद्धव ठाकरेंनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली. सरकारला राममंदिराच्या मुद्यावर पुन्हा मतं मागण्याचा अधिकार नसल्याचं त्यांनी सांगितले. कुंभकर्णाला जाग येण्यासाठी पंढरपुरात २४ डिसेंबरला सभा घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
त्यामुळे राममंदिराच्या मुद्यावरून शिवसेना भाजपला जेरीस आणणार असल्याचं दिसंतय. आज उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनात राज्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत आगामी निवडणूक आणि दुष्काळावर रणनिती ठरवण्यात आली.