मुंबई: इंधन दरवाढीवरील वक्तव्यावर केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवलेंनी माफी मागितली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या किमतींमुळे मला काही फरक पडत नाही, कारण मी एक मंत्री आहे. मला मोफत पेट्रोल-डिझेल मिळते असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले होते. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. 


या पार्श्वभूमीवर आठवलेंनी जनतेची माफी मागितली. आपल्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो. कुणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मीही एक सामान्य आहे आणि आता मंत्री झालोय इतकचं. सामान्यांच्या समस्या मी जाणतो. मी सरकारमध्ये आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलची दरवाढ कमी करायला हवी, असे आठवलेंनी सांगितले.