मुंबई : भारत आणि चीनमधल्या वाढत्या तणावावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी आहेत, असं ट्विट राहुल गांधींनी केलं. राहुल गांधींच्या या ट्विटला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिलं. नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी नसून धुरंधर मोदी आहेत असं सांगत राहुल गांधी यांनी मात्र बालिश आरोप करणे सोडावे. असा प्रतिटोला रामदास आठवले यांनी राहुल गांधींना लगावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सरेंडर मोदी म्हंटल्या प्रकरणी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी देखील रामदास आठवले यांनी केली आहे. दरम्यान, लढाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांवर कपट कारस्थानाने चीनने हल्ला केला या हल्ल्याचा प्रतिकार शूरवीर भारतीय जवानांनी केला. 


चीनच्या हल्ल्यात २० जवान शहीद झाल्याने देशवासीयांच्या भावना तीव्र  आहेत. अशा काळात देश एकसंघपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभा आहे. अशा काळात काँग्रेस नेते राहुल गांधी चुकीची बालिश वक्तव्ये करीत आहेत. देशाच्या एकजुटीचे प्रदर्शन घडविण्याच्या काळात राजकीय टीका करताना बालिश वक्तव्ये करीत आहेत. 


राहुल गांधींच्या बालिश वक्तव्यामुळे काँग्रेस पक्षाचे नुकसान होत असल्याचे वक्तव्य देखील रामदास आठवले यांनी केले. राहुल गांधींनी केलेल्या या आरोपांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. राहुल गांधींनी भारत-चीन संघर्षावर गलिच्छ राजकारण सोडावं, असं अमित शाह म्हणाले होते.