नवी दिल्ली : भाजपा-शिवसेनेला जनमत असून त्यांनी सत्तास्थापन करावे  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. आम्हाला जनतेने विरोधात बसण्याचा कौल दिल्याचेही ते म्हणाले. त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीशी जवळीक साधू पाहणाऱ्या शिवसेनेची पंचाईत झाली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांच्या भुमिकेचे रामदास आठवले यांनी स्वागत केले. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये सरकार बनेल. शिवसेनेनेही हट्ट सोडून उपमुख्यमंत्री पद घेत सरकारमध्ये सामिल व्हावे असेही ते म्हणाले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युतीत सत्तासंघर्ष सुरु झाल्यापासून रामदास आठवले यांनी भाजपाच्या बाजूने प्रतिक्रिया दिली आहे.



शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी शिवसेनेला पाठींबा देऊ नये अशी विनंती देखील आठवले यांनी याआधी केली होती. त्यांनी तसे केल्यास तो आत्मघातकी निर्णय होऊ शकतो असे आठवले म्हणाले होते. शिवेसेनेने मुख्यमंत्री पदाचा सोडून द्यावा असा सल्ला देखील आठवले यांनी शिवसेनेला दिला आहे.