दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाबाबतची आजची बैठक चांगलीच वादळी ठरली. मुंबई - गोवा महामार्ग रखडल्याने शिवसेनेचे मंत्री रामदास कदम बैठकीत आक्रमक झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामुद्द्यावरुन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि रामदास कदम यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. महामार्गाचे काम रखडल्यावरुन रामदास कदम यांनी चंद्रकांत पाटील यांना खडेबोल सुनावले. 


जर समृद्धी महामार्गासाठी 200 पोलीस लावून कामे करता तर कोकणचा रस्ता का होत नाही असा संतप्त सवाल यावेळी रामदास कदमांनी चंद्रकांत पाटलांना केला. 


२०१४मध्ये सरकार सत्तेत आलं होत तेव्हा २०१६पर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होणार असल्याचं आश्वासन दिलं होत. मात्र आता नवी डेडलाईन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दिली जातेय. त्यामुळे रामदास कदम चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. या बैठकीचा EXCLUSIVE व्हिडिओ झी २४ तासच्या हाती लागलाय.