मुंबई : शिवसेना नेते रामदास कदम आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यातील वाद आता काही लपून राहिलेला नाही. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी असल्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील वाद अजून काही मिटलेला नाही. असे असताना आज रामदास कदम हे अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी विधान भवनात पोहोचले. मात्र, त्यांना विधान भवनाच्या गेटवरच रोखण्यात आले.          


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाईंना विधान भवनाच्या गेटवरच अडवण्यात आल्याची बातमी काही क्षणातच शिवसेना नेत्याना कळली आणि एकच पळापळ सुरु झाली. अनिल परब हे संसदीय कार्य मंत्री असल्यामुळे त्यांनीच आदेश दिले होते कि काय असा काही जणांचा समज झाला. मात्र, त्या आमदारांनाही कारण कळताच त्यांचाही जीव भांड्यात पडला.


रामदास कदम यांना शिवसेनेत भाई म्हटलं जातं. आज शुक्रवारी ते सकाळी विधान भवनात दाखल झाले. पण, त्यांच्याकडे कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र नव्हते. त्यामुळे त्यांना गेटवरच अडवण्यात आले. रिपोर्ट नाही तर प्रवेश नाही हे सांगताच भाईंचा पारा चढला. त्यांनी प्रवेश देण्याचा आग्रह सुरूच ठेवला. मात्र, पोलीस आपल्या नियमावर ठाम राहिले.


पोलिसांनी कदम यांना अडविल्याचा निरोप एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील या मंत्र्यांना मिळाला. त्यांनी मग अन्य आमदारांसह विधानभवनाच्या गेटवर आले. पोलिसांशी चर्चा केली. तरीही त्यांनी कदम यांना प्रवेश दिला नाही. अखेर, कदम यांनी  'अँटीजेन' चाचणी करून त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच भाईना विधानभवनात प्रवेश मिळाला.