मुंबई : Rana couple's bail application in Mumbai Sessions Court :14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या राणा दाम्पत्याची जामिनासाठी धावाधाव सुरु आहे. राणा दाम्पत्याने मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. (Navneet Rana and Ravi Rana's bail application in Mumbai Sessions Court) आज या जामिनावर सुनावणी होणार आहे. आता सत्र न्यायालयात राणांना दिलासा मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्याची याचिका फेटाळल्यानंतर नवनीत आणि रवी राणांनी जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यांच्या जामीन अर्ज याचिकेवर आज सुनावणी आहे. आता  सत्र न्यायालयात राणांना दिलासा मिळणार का याकडे लक्ष लागले आहे.


दरम्यान, काल मुंबई उच्च न्यायालयात नवनीत राणांना मोठा दणका बसला. मुंबई पोलिसांनी दाखल केलेला राजद्रोहाचा गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी राणांची याचिका मुंबई उच्चन्यायालयाने फेटाळली. सुट्टीकालीन न्यायालयाने राणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता राणांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे.