अमित जोशी, मुंबई : जावई हर्षवर्धन जाधव पडल्याचे दुःख नाही तर युतीची एक जागा कमी झाल्याचे दुःख आहे. अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जागेवर नरेंद्र मोदी उभे आहेत असे आम्ही समजत होतो. त्यामुळे औरंगाबादची युतीची एक जागा कमी झाली याचे दुःख वाटतं आहे. अशी भावना दानवे यांनी व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी युतीचा फ़ॉर्म्युला आधी ठरल्याप्रमाणे राहणार, आमचा 50-50 चा फॉर्म्युला ठरलेला आहे. विधानसभाही एकत्र लढणार असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केलं आहे.


औरंगाबादमधून वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील विजयी झाले आहेत. औरंगाबादमध्ये चंद्रकात खैरे हे सलग चारवेळा खासदार धाले होते. मात्र पाचव्यांदा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 1999, 2004, 2009 आणि 2014 मध्ये खैरेंनी विजय मिळवला होता. पण यंदा शिवसेनेचे बंजखोर उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष निवडणूक लढवल्याने खैरेंना पराभवाचा सामना करावा लागला.