मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आदेश दिला तर भाजपच्या कार्यकर्त्यांना काहीही करून ते काम पूर्ण करावेच लागते, असे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले. ते गुरुवारी प्रदेश समितीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी दानवे यांनी दिलेल्या एका उदाहरणामुळे मोदी-शहा जोडगोळीच्या पक्षातील धाकाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 


पक्षाकडून कार्यकर्त्यांना अनेक कामं देण्यात आली आहेत. ती आवाक्याबाहेर वाटत असली तरी पक्षश्रेष्ठींचा आदेश असल्यामुळे ती करण्यावाचून गत्यंतर नाही, असे रावसाहेब दानवेंनी म्हटले. यासाठी दानवेंनी कार्यकर्त्यांना एक भन्नाट किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकून सभेत चांगलाच हशा पिकला. मात्र, यावरुन राजकीय वर्तुळात मोदी-शहा जोडगोळीच्या धाकाची चर्चा नव्याने रंगली आहे.