मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात एका तरुणीनं बलात्काराचे आरोप केल्यानं खळबळ उडाली आहे. यासंदर्भात रेणू शर्मा या तरुणीनं मुंबईतल्या ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. याबाबत या तरुणीनं २००६ पासून अत्याचार सुरु होते. पुढे बॉलीवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनंजय मुंडे यांनी मात्र याबाबत झी २४ तासकडे खुलासा केलाय. हे  हे सर्व आरोप खोटे असून बदनामी करणारे आणि आपल्याला ब्लॅकमेल करण्यासाठी असल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे.


राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप नेत्यांकडे मदतीची साद
या तरूणीने पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्वीट करत तिने ही माहिती दिली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्वीट करत मदतीची साद घातली आहे.