महिलेवर बलात्कार आणि नंतर क्लिप व्हायरल, गुन्हा दाखल
महिलेवर बलात्कार करून त्याची व्हिडीओ क्लिपनंतर, सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : महिलेवर बलात्कार करून त्याची व्हिडीओ क्लिप नंतर सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहिसरमधील योगेंद्र भागवले याला या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे.
विवाहितेला शीतपेयातून गुंगीचे औषध
पश्चिम उपनगरातील एका विवाहितेला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्यानंतर त्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची घटना उघडकीस आली आहे.
आरोपीच्या मित्रावरही गुन्हा दाखल
तीन महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेबाबत दहिसर पोलीस ठाण्यात योगेंद्र भागवले नावाचा तरुण आणि त्याच्या मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला. अंधेरीत पतीसह राहणारी एक महिला वर्षी २३ डिसेंबरला दहिसरमध्ये योगेंद्र भागवले याला भेटण्यासाठी आली होती.
कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध
भागवले दुपारी तिला महाराजा हॉटेलमध्ये घेऊन गेला. कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध घालून दिले. बेशुद्ध झाल्यानंतर त्याने आणि मित्राने तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप या महिलेना केला आहे.
व्हिडीओ क्लिप अपलोड केली
तसेच मोबाइलवर शूटिंग केले. सायंकाळी ही महिला शुद्धीवर आल्यानंतर बदनामी होईल, म्हणून तिने कोणालाही घडलेला प्रकार सांगितला नाही. मात्र, काही दिवसांनंतर भागवलेने तिचा ईमेल, फेसबुक आणि ट्वीटर अकाउंट हॅक केले. त्यावर व्हिडीओ क्लिप अपलोड केली. हा प्रकार समजल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.