मुंबई : स्टँडअप कॉमेडिअन अग्रिमा जोशुआला बलात्काराची धमकी देणाऱ्या युट्यूबर शुभम मिश्राच्या विरोधात वडोदरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केलं आहे. अभिनेत्री स्वरा भास्करने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. तो व्हिडिओ महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील टॅग केला होता. देशमुख यांनी मुंबई पोलीस आणि सायबर सेलला याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुभमच्या विरोधात कलम २९४ (अश्लिलता) ३५४ (ए), ५०४ (जाणून बुजून सार्वजनिक शांतता भंग करणे) ५०५ (भडकाऊ बोलणं) ५०६ (धमकी देणे) ५०९ (महिलेचा अपमान करण) यासारखे कलम शुभमवर लावण्यात आले आहेत 



काय आहे प्रकरण? कॉमेडिअन अग्रिमा जोशुआवर आरोप आहे की, २०१९ साली एक लाईव्ह शोदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. एकेरी उल्लेख केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गृहमंत्री देशमुख यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. शुभम मिश्रा नावाच्या तरूणाने जोशुआबद्दल अपशब्द बोलले आहेत.



जोशुआचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून शनिवारी त्या कॅफेची तोडफोड करण्यात आली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी जोशुआ विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.