मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. राज्यात आज एका दिवसात तब्बल 12 हजार 248 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज दिवसभरात, आतापर्यंतच्या एका दिवसातील सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात 24 तासात 390 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा सतत वाढत असताना, कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत असल्याची दिलासादायक बाब समोर येत आहे. आज दिवसभरात महाराष्ट्रात 13 हजार 348 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 3 लाख 51 हजार 710 कोरोनाग्रस्त बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 68.25 टक्के इतका आहे. 


राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 15 हजार 332 इतकी झाली आहे. सध्या राज्यात 1 लाख 45 हजार 558 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 



राज्यात एकूण 17 हजार 757 जणांचा बळी गेला असून महाराष्ट्रातील मृत्यूदर 3.45 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 10,00,588 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून 34,957 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.