Rashmi Thackeray Morcha Video : महापुरुषांचा अवमान झाल्यानंतर राज्यपालांविरोधात आंदोलन सुरु झालं आहेत. मुंबईत (Mumbai News) शनिवारी महाविकास आघाडीचा हल्लाबोल मोर्चा (Maha Vikas Aghadi Morcha) सुरु होता. या मोर्चात कोण कोण येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), अजित पवार (Ajit Pawar) आणि नाना पटोले (Nana Patole) यांनी आपल्या पक्षाचे झेंडे खांद्यावर घेत मोर्चात सहभागी. या भव्य मोर्चात एका व्यक्तीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. एवढंच नाही तर राजकीय वर्तुळातही या व्यक्तीचीच चर्चा रंगली होती. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या सूनबाईंनी रश्मी उद्धव ठाकरे (Rashmi Thackeray)...राजकीय घरातील काही स्त्रिया या प्रत्यक्ष राजकारणात नसल्या तरी त्या चर्चेत मात्र कायम असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Maha Vikas Aghadi Morcha Updates : महाविकास आघाडीचा मोर्चा कशासाठी?


हो रश्मी ठाकरे...या भव्य अशा मोर्चात पहिल्यांदाच सहभागी झालेल्या रश्मी ठाकरे चिकार एक शब्द न बोलता त्यांनी सर्वसामान्यांपासून कार्यकर्त्यापर्यंत सगळ्यांची मनं जिंकली. कायम उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या रश्मी ठाकरे आज मोर्चामध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होत्या. संपूर्ण ठाकरे कुटुंब शनिवारी मोर्च्यात सहभागी झालं होतं. पण चर्चा झाली ती रश्मी ठाकरे यांची...साधी साडी, कुठलही मेकअप नाही की उन्हाचा परवा नाही... मोर्च्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधतं, कधी महिला कार्यकर्त्यांची विचारपूस करताना...मोर्च्यात अजून ठाकरे कुटुंबियातील या Home Minister चं वलय दिसून आलं.



रश्मी ठाकरे या राजकारणात सक्रिय होणार का ? अशी चर्चा अनेकदा समोर आली आहे. मात्र, उघडपणे कधीही रश्मी ठाकरे या सक्रिय होतांना दिसून आल्या नव्हत्या. पण आजच्या मोर्च्यातील त्यांचा सहभाग खूप बोलका वाटला. काही दिवसांपूर्वी रश्मी ठाकरे यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठीही (Chief Minister) चर्चा झाली. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या हळदी कुंकू, भोंडला अश्या कार्यक्रमात त्या आवर्जून सहभागी व्हायच्या. पण याव्यतिरिक्त राजकीय मंचावर त्या कधीही महत्वाकांक्षी वाटल्या नाहीत. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष (Maharashtra Political crisis) सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिलेला दगा बाजूला करुन त्या नवरात्रांमध्ये ठाण्याच्या देवीच्या दर्शनाला गेल्या होत्या. 


असाही एक किस्सा!


2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेना भाजपच्या अंतर्गत वादानंतरही युती झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांना या युतीबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावेळी ते म्हणाले होते की, 'रश्मी वहिनींनी बटाटे वडे (Batata vada) आणि साबुदाण्याची खिचडी (sabudana khichdi) खायला घातली आणि त्यानंतर काही बोलायची गरजच लागली नाही.' (Rashmi Thackeray Maha Vikas Aghadi Morcha Video Home Minister Uddhav Thackeray big contribution politics news)




शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कठीण काळात त्या नेहमी साथ देताना दिसतात, खांद्याला खांदा लावून लढतायत. 


रश्मी ठाकरेंबद्दल तुम्हाला या खास गोष्टी माहित आहेत का?


रश्मी ठाकरे यांचा जन्म दाभोळचा आहे. मात्र त्यांचं बालपण डोंबिवलीमध्ये गेलं.


13 डिसेंबर 1988 रोजी त्यांचा विवाह उद्धव ठाकरेंसोबत झाला.


घरी आलेल्या प्रत्येकाचं उत्साहानं आणि आदरातिथ्य करून जनमानसाची योग्य नाळ ओळखण्यात त्या माहीर आहेत.


त्यांनी नेत्यांसोबत चर्चा करून लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल याची रणनिती आखली.


दूरदृष्टी, अचून निर्णय क्षमता आणि उद्धव ठाकरेंसोबत झालेली सल्लामसलत यांमुळे कायमच उद्धव ठाकरेंना यश मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.


2010मध्ये कल्याण-डोंबिवली  महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची धुरा रश्मी ठाकरेंकडे होती.


त्याचं कोणासोबतही वैर नाही. अगदी विरोधकांपासून ते सत्ताधाऱ्यांपर्यंत रश्मी ठाकरे सगळ्यांनाच अगदी उत्तम पद्धतीनं टॅकल करतात.


शांत आणि संयमानं योग्य विचार करून रणनीती आणखं आणि हट्टाला पेटून ती पूर्ण होईपर्यंत चिकाटी न सोडता त्याचा पाठपुरावा करणं हा त्यांचा विशेष गुण आहे.


त्या कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्या कानावर आलेल्या प्रत्य़ेक गोष्टी अथवा प्रसंगाचा उलटतपास करून निर्णय घेतात.


उद्धव ठाकरेंबद्दल नकारात्मक बोलेलं त्यांना अजितबात आवडत नाही. त्या स्वत: अत्यंत सकारात्मक विचार करण्याऱ्या दुसऱ्या माँ असा  उल्लेख शिवसेना कार्यकर्ते करतात.


आता भविष्यात रश्मी ठाकरे राजकारणात येतात का हे पाहणं औत्सुकाचं ठरणार आहे.