MVA Mumbai Morcha LIVE : महाविकास आघाडीच्या मोर्चात सरकारवर हल्लाबोल, राज्यपाल हटावचा नारा

MVA Mumbai Morcha LIVE Updates : महापुरुषांच्या अवमानाप्रकरणी आज महाविकास आघाडीचा मुंबईत हल्लाबोल मोर्चा आहे. या मोर्चात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते सहभागी होणार आहेत.  

MVA Mumbai Morcha LIVE :  महाविकास आघाडीच्या मोर्चात सरकारवर हल्लाबोल, राज्यपाल हटावचा नारा

MVA Mumbai Morcha LIVE Updates : महापुरुषांच्या अवमानाप्रकरणी आज महाविकास आघाडीचा मुंबईत हल्लाबोल मोर्चा आहे. या मोर्चात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते सहभागी होणार आहेत. भायखळा एटीएस कार्यालय समोर मोर्चासाठी सकाळी 10 वाजता कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली. मविआचा तब्बल 1 लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते जमवण्याचा प्रयत्न आहे. मविआचे प्रमुख नेते मोर्चात सहभागी झालेत. आणि जे जे फ्लायओव्हरवरुन हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ येऊन थांबणार आहे. या मोर्चात समाजवादी पक्षाचे मुस्लीम कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात हा हल्लाबोल मोर्चा.

17 Dec 2022, 14:09 वाजता

महाराष्ट्राच्या सन्मानासाठी आपण एकटवलो -  पवार
Maha Vikas Aghadi Morcha Updates :  महाराष्ट्राच्या सन्मानासाठी आपण सगळे एकटवलो आहोत, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले संयुक्त मोर्चेवेळी मोठे मोर्चे निघाले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही. सामान्य माणसांच्या मनावर एक नाव अखंड आहे, ते म्हणजे 'छत्रपती शिवाजी महाराज, असे पवार म्हणाले.

पवार म्हणाले, ज्यांच्या हातात सत्तेची चावी आहे. महाराष्ट्राचा महापुरुषांबाबत चुकीची भाषा वापरत आहेत. शिवाजी महाराज यांचं नावं आज साडे तीनशे वर्ष झाले तरी नावं अखंड आहे. आणि त्यांच्या नावाचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. त्यामुळेच आज लाखोंच्या संख्येने मोर्चा एकत्र आला आहे. जर माफी मागितली गेली नाही तर हा तरुण शांत बसणार नाही. आजचे राज्यकर्ते महापुरुषांचा अपमान करतात मला विधान भवनात जाऊन 55 वर्षे झाली अनेक राज्यपाल मी पाहिले तत्कालीन राज्यपालांनी महाराष्ट्राच नावं लौकिक वाढवण्याच काम केलं. मात्र हे राज्यपाल सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत आहेत.

17 Dec 2022, 13:52 वाजता

उद्धव ठाकरे यांचा सरकारवर निशाणा
Maha Vikas Aghadi Morcha Updates :  महाविकास आघाडीच्या मोर्चात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला. सध्याचे पालकमंत्री मुंबईचा हिशोब स्क्वेअर फुटामध्ये करतात. संयुक्त महाराष्ट्रानंतरचा हा सर्वात मोठा लढा आहे. मी कोश्यारींना राज्यपाल मानत नाही. बेळगाव महाराष्ट्रात आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.राज्यपाल राष्ट्रपतीचे दूत असतात, मात्र त्याचा कोश्यारींना विसर. 'भीक' शब्दावरुन ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल ठाकरे यांनी चढवला. छत्रपतींचं नाव घेण्याचा लफंग्यांना अधिकार नाही. महाराजांची तुलना शिंदेंशी करणाऱ्या मंगलप्रभात लोढा यांचा चांगलाच समाचार ठाकरे यांनी घेतला.

17 Dec 2022, 13:45 वाजता

Maha Vikas Aghadi Morcha Updates : मोर्चात अजित पवार यांनी सरकारवर टीका केली. राज्यपाल कोश्यारी हटाव, असा नारा दिला. सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य होत आहेत. याला आळा घालण्याची गरज आहे. बेताल वक्तव्य रोखण्याची वेळ आली आहे. चूक झाल्यावर माफी मागितली जाते मात्र, या राज्यांत तसं दिसत नाही. भीक मागतात अशी वक्तव्ये करतात. मधल्या काळात पुणे सोलापूर बंद होतें त्याला कारण तसं आहे. आजचा कार्यकर्त्यांचा उत्साह पहाता सत्ताधारी गोटात धडकी भरल्याशिवाय रहाणार नाही. वादग्रस्त वक्तव्य होत आहेत एक कडक कायदा करण्याची गरज आहे. माझी मागणी आहे तत्काळ बिल आणा विरोधी पक्ष तुम्हाला पाठींबा देईल, असे पवार म्हणाले.

17 Dec 2022, 13:41 वाजता

Maha Vikas Aghadi Morcha Updates : शिंदे-फडणवीस सरकार तुम्ही फेब्रुवारी महिना बघणार नाही, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
- आजचा मोर्चाने राज्यपालांना डीसमिस केले आहे
- मोर्चाने इशारा दिला शिंदे-फडणवीस सरकार तुम्ही फेब्रुवारी महिना बघणार नाही
- महापुरुषांक्सह अपमान केलेल्यानाना सत्तेत बसायचा अधिकार नाही
- सत्ता उलथवण्यासाठीचे हे पहिले पाऊल
- रणनिती ठरली आहे, घोर युद्धासाठी सज्ज व्हायचय
- कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना आमच्या हातात द्या
- सरकार लटपटायला लागले आहे
- महाराष्ट्र एक आहे हे सांगायला मोर्चा

17 Dec 2022, 13:27 वाजता

Maha Vikas Aghadi Morcha Today Updates : महाविकास आघाडीच्या मोर्चात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सहभागी झालेत. मोर्चा सभास्थळी पवार उपस्थित. व्यासपीठावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विरोधीपक्ष नेते अजित पवार, नाना पटोले, संजय राऊत आदी नेते उपस्थित

17 Dec 2022, 13:24 वाजता

Maha Vikas Aghadi Morcha Today Updates : महाविकास आघाडीच्या मोर्चात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सहभागी झालेत. 

17 Dec 2022, 12:56 वाजता

Maha Vikas Aghadi Morcha Updates : महाविकास आघाडीच्या मोर्चात महाराष्ट्र एकीकरण समितीही मोर्चात सामील झाली आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील मोर्चात सामील झाल्यात. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोले यांनी आपल्या पक्षाचे झेंडे खांद्यावर घेत मोर्चात सहभागी.

17 Dec 2022, 12:31 वाजता

Maha Vikas Aghadi Morcha Updates : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरील बेस्ट बस थांब्यावरुन पुढील सूचना मिळेपर्यंत बस वाहतूक बंद करण्यात आलेय. नागपाडा परिसरातून मोर्चा सुरु झालाय. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या सीएसएमटी बेस्ट थांबा बंद करण्यात आला आहे. प्रवाशांनी या बस थांब्यावर बससाठी थांबू नये, अशा सूचना पोलिसांकडून देण्यात येत आहेत.

17 Dec 2022, 12:09 वाजता

Maha Vikas Aghadi Morcha Today Updates : महाविकास आघाडीचा आज मुंबईत महामोर्चा काढण्यात येत आहे. तिन्ही पक्षांकडून शक्तिप्रदर्शन होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे मोर्चात सहभागी होण्यासाठी मातोश्रीवर बाहेर पडलेत.

17 Dec 2022, 12:08 वाजता

Maha Vikas Aghadi Morcha Today Updates : मोर्चात मविआचे नेते सहभागी होत आहेत. यावेळी मविआच्या नेत्यांनी भाजप, शिंदे गटावर निशाणा साधला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणा-या राज्यपालांनी अजून माफी का मागितली नाही, असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे. तर हा मोर्चा महाराष्ट्रद्रोह्यांच्याविरोधात असल्याचं नानो पटोले, अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.