मुंबई : आज सकाळी राज्याच्या राजकाणात मोठा भूकंप पाहायला. सकाळी आठ वाजता देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ माजली आहे. म्हणून राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ हे अजित पवारांची समजूत काढण्यासाठी श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी निघाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ते पवांरांच्या निर्णयामागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. अजित पवारांच्या निर्णयानंतर त्यांची विधिमंडळ गटनेता पदावरून हाकालपट्टी करण्यात आली आहे.  


अजित पवारांना आमदारांचा पाठिंबा नाही
'महाविकास आघाडीला १६९ आमदारांचा पाठिंबा होता. अजित पवारांचं कृत्य पक्षाच्या धोरणाविरुद्ध असल्यानं राष्ट्रवादीचा कार्यकर्ता भाजपसोबत नाही.. गेलाच तर अशा आमदाराचं सदस्यत्व रद्द करण्यात येईल. अजित पवारांसोबत राजभवनात ११-१२ आमदार उपस्थित होते. पण आता केवळ सहा - सात आमदार अजित पवारांसोबत आहेत. बाकीचे परत आलेत' असा दावा शरद पवार यांनी केला.