रतन टाटा यांच्या बाबांसारखेच तुमचे बाबाही विचार करतात का?
रतन टाटा यांनी आपल्या वडिलांसोबत असलेल्या मतभेदांचाही उल्लेख केला आहे, हे मतभेद
मुंबई : रतन टाटा यांनी आपल्या वडिलांसोबत असलेल्या मतभेदांचाही उल्लेख केला आहे, हे मतभेद आजच्या प्रत्येक मुलाला, आपले बाबाही असंच काहीतरी आपल्या निर्णयाच्या विरोधात बोलतात, सांगतात असं नक्कीच वाटणारे आहेत.
रतन टाटा आपल्या वडिलांशी असणाऱ्या मतभेदाबद्दल बोलताना लिहितात, 'आता हे सांगणं कठीण आहे की, कुणाचं चुकायचं आणि कोण बरोबर होतं'.
मला वायोलिन शिकायचं होतं, आणि माझे बाबा मला म्हणायचे, मी पियानो शिकायला पाहिजे, मी शिक्षणासाठी अमेरिका जावू इच्छित होतो, पण त्यांना वाटायचं की मी ब्रिटनला गेलं पाहिजे. मला आर्किटेक्ट व्हायचं होतं, पण ते अडून बसले की मी इंजिनिअर का होत नाही.
यानंतर रतन टाटा शिक्षणासाठी अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठात गेले आणि रतन टाटा यांनी आपलं संपूर्ण श्रेय हे आपल्या आजीला दिलं. रतन टाटा म्हणतात, मी मॅकेनिकल इंजीनिअरिंगसाठी प्रवेश घेतला होता, मात्र नंतरबाहेर पडताना मी ऑर्किटेक्चरची डिग्री घेऊन बाहेर पडलो. यानंतर रतन टाटा यांनी लॉस एंजेलिसमध्ये नोकरी केली, या मोठ्या उद्योजकाने या शहरात २ वर्ष नोकरी केली.
या बातमीशी संबंधित महत्त्वाच्या बातम्या
रतन टाटा यांच्या बाबांसारखेच तुमचे बाबाही विचार करतात का?
रतन टाटांनी सांगितली त्यांची प्रेमकहाणी...
रतन टाटा यांच्या आजीसारखी आजी सर्वांना मिळो!