रतन टाटा यांचा उत्तराधिकारी ठरला! Tata Trusts अध्यक्षपदावर नोएल टाटा यांची निवड
Ratan Tata`s successor : रतन टाटा यांचा उत्तराधिकारी ठरला आहे. Tata Trusts च्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची निवड झालीय.
Noel Tata New Chairman as Tata Trusts : रतन टाटा यांच्यानंतर ₹34000000000000 चं महासाम्राज्य कोण सांभाळणार यांची चर्चा रंगली आहे. टाटा समूहाच्या केंद्रस्थानी असलेली टाटा ट्रस्टसाठी उत्तराधिकारी निवडण्यात आलाय. ट्रस्टची शुक्रवारी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, यात हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झालीय.
नोएल टाटा हे आधीपासून सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टमध्ये विश्वस्त आहेत, जे टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्समध्ये 66% भागीदारी करतात. 165 अब्ज रुपयांच्या टाटा समूहाच्या कारभारात ट्रस्टची महत्त्वाची भूमिका आहे.
कोण आहेत नोएल टाटा?
रतन टाटांचे वडील नवल टाटा यांचं दोन लग्न झाले होते. नवल टाटा यांची पहिली पत्नी सूनी टाटा यांना रतन टाटा आणि जिमी टाटा अशी दोन मुलं झाली. सूनी टाटांशी घटस्फोट घेतल्यानंतर नवल टाटा यांनी 1955 मध्ये दुसरं लग्न केलं. नवल टाटा यांची दुसरी पत्नी सिमोन या स्वित्झर्लंडच्या एक महिला उद्योगपती होत्या. नोएल टाटा हे नवल टाटा आणि सिमोन टाटा यांचा मुलगा आहेत.
नोएल टाटा हे 63 वर्षांचे असून ते ट्रेंटचे अध्यक्ष आहेत. गेल्या काही वर्षांत नोएल यांनी टाटा ट्रस्टमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत. टाटा समूहातील नोएल यांची कारकीर्द साधारणतः 2000 पासून सुरू झाली. 2010-2011 पर्यंत त्यांची टाटा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आली. त्यानंतर त्यांचे मेहुणे सायरस मिस्त्री यांना रतन टाटा यांचे उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आले होते. पण ऑक्टोबर 2016 मध्ये त्यांचे मेहुणे सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आले. या काळात टाटा समूहातील नोएल टाटांची भूमिका सतत विस्तारत गेली.
टाटा समूहाच्या रिटेल कंपन्यांच्या विस्तारात नोएल टाटा यांची महत्त्वाची भूमिका असून त्यांच्या नेतृत्वादरम्यान, ट्रेंटने विस्तार केल्याच पाहिला मिळतं. टाटा समूह आता वेस्टसाइड, स्टार बाजार आणि झुडिओ सारख्या ब्रँड्सचे व्यवस्थापन ते पाहतात. त्याशिवाय झारा आणि मॅसिमो दत्ती सारख्या जागतिक ब्रँडचे व्यवस्थापनही त्यांच्याकडे आहे.