Parsi Death Ceremony: प्रसिद्ध उद्योगती रतन टाटांचं वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. रतन टाटा हे पारशी समुदायातील होते. झोराष्ट्रीयन समुदायाचा भाग असलेलं टाटा कुटुंब मूळचं गुजरातचं आहे. मात्र त्यांची संपूर्ण व्यवसायिक कारकिर्द मुंबई (पूर्वीचं बॉम्बेमध्ये) गेली. मृत्यूनंतर पारशी समाजामध्ये अंत्यसंस्काराची पद्धत फार वेगळी आहे. मात्र रतन टाटांवर विद्युतदाहिनीच्या माध्यमातून अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. रतन टाटा यांच्यावर वरळीतील पारशी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून रतन टाटांचं पार्थिव एनसीपीएमध्ये अंत्यदर्शनसााठी ठेवण्यात आलं आहे.


आधी प्रार्थना मग अत्यंसंस्कार...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्व सामान्यांबरोबरच अनेक मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतल्यानं दुपारी 4 वाजल्यानंतर रतन टाटांचं पार्थिव अंत्यसंस्कार पारशी स्मशानभूमीत नेलं जाणार आहे. इथं असणाऱ्या प्रार्थना सभागृहात 200 लोकांच्या उपस्थितीमध्ये प्रार्थना होईल. त्यानंतर विद्युतदाहिनीच्या माध्यमातून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. मात्र पारशी समाजामध्ये पारंपारिक पद्धतीने अत्यंस्कार करताना त्यामध्ये गिधडांना फार महत्त्व आहे. पारशी लोक मृतदेह पुरतही नाही आणि तो अग्नीच्या स्वाधीनही करत नाही. यामागील कारणं काय आहेत पारशी समाजामध्ये कशीप्रकारे अत्यंस्कार होतात पाहूयात...


गिधडांना खायला सोडतात मृतदेह


जाळण्याऐवजी, गाडून टाकण्याऐवजी किंवा पाण्यात टाकण्याऐवजी, पारशी लोक मृतदेह गिधाडांना खाण्यासाठी ठेवतात. दोन-तीन महिन्यांत गिधाडे शरीराचे मांस खातात आणि उरलेली हाडे खड्ड्यात टाकून पुरली जातात. ज्या ठिकाणी हा मृतदेह गिधाडांना खायला ठेवला जातो त्याला दखमा म्हणजेच टॉवर्स ऑफ सायलेन्स असं म्हणतात. पारशी धर्मात मृत्यूनंतरचा अखेरचा विधी चार दिवस चालतो. पहिल्या दिवशी मृतदेह टॉवर्स ऑफ सायलेन्समध्ये गिधाडांना खाण्यासाठी सोडला जातो. चौथा दिवस आत्म्याच्या न्यायाचा दिवस मानला जातो. 


नक्की वाचा >> जेव्हा 'Congratulations Chhotu' म्हणणाऱ्या तरुणीला रतन टाटांनी दिलेलं उत्तर; जगभर गाजला 'तो' Reply


...म्हणून जाळत किंवा पुरत नाही मृतदेह


पारशी समाजातील मान्यतेनुसार, अहुरमाजदा म्हणजेच पारशींचा देव सर्व काही जाणतो, परंतु तो सर्वशक्तिमान नाही. त्यामुळेच पारशी समाजामध्ये मृत्यू अहुरमाजदा देत नाही असं मानलं जातं. मृत्यू देणे हे सैतानाचे काम आहे, असं हे लोक मानतात. आत्मा शरीरातून निघून गेल्यावर शरीरात नसो म्हणजेच सैतान वास करतो. त्यामुळे मृतदेह अशुद्ध होतो अशी या लोकांची मान्यता आहे.


नक्की वाचा >> Tata Death: मध्यरात्री रुग्णालयात पोहोचले मुकेश अंबानी; भावूक होत म्हणाले, 'रतन तू कायम माझ्या..'


पारशी समाजामध्ये अग्नीला देवाचा पुत्र मानलं जातं. हे लोक अग्नीची पूजा करतात. पाणी आणि मातीही पवित्र आहे अशी मान्यता या लोकांमध्ये असल्यानेच कोणाच्या मृत्यूनंतर मृतदेह अग्नीच्या स्वाधीन केला जात नाही किंवा दफनही केला नाहीत. मृतदेह अग्नीच्या स्वाधीन केल्याने अथवा दफन केल्याने मृतदेहामधील नसो आग, पाणी आणि मातीमध्ये प्रवेश करुन त्यांना दुषित करतो अशी या लोकांची मान्यता आहे. 


नक्की वाचा >> 9000 कोटी दान, 150 कोटींचं घर, कोरोनात 2500 कोटी मदत अन्...; रतन टाटांचा पगार किती होता?


गिधडांनी मांस खाल्ल्यानंतर काय?


हिंदूंमध्ये ज्या प्रमाणे पुजारी अत्यंसंस्कार करतात त्याप्रमाणे पारशी समाजात नसासलारांकडे ही जबाबदारी असते. मृतदेह स्वच्छ करुन त्याला टॉवर्स ऑफ सायलेन्समध्ये ठेवण्यासाठी तयार केलं जातं. मृतदेह  टॉवर्स ऑफ सायलेन्समध्ये मृतदेह आणल्यानंतर, मृताच्या कुटुंबीयांना शेवटचे पाहण्याची संधी मिळते, परंतु 9 फूट अंतरावरून. येथे मृतदेहाचे कपडे काढून ते एका खड्ड्यात जाळले जातात. शरीर कपड्यांशिवाय ठेवले जाते. पहिले तीन दिवस आत्मा शरीराबाहेर त्याच ठिकाणी राहतो, असं पारशी लोकांची मान्यता आहे. तीन दिवसांनंतर आत्मा लहान मुलासारखा होतो आणि घाबरतो. चौथा दिवस न्यायाचा मानला जातो. म्हणजेच आत्म्याच्या न्यायाचा दिवस असतो. या दिवशी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी तेथे उपस्थित राहावेच अशी मान्यता आहे. गिधाडांनी मांस खाल्ल्यानंतर उरलेली हाडे उन्हात आणि पावसात कुजण्यासाठी सोडली जातात. शेवटी शरीराचा उरलेला भाग शिल्लक राहिला असेल तर तो नसासलादर टॉवर ऑफ सायलेन्सच्या मध्यभागी बांधलेल्या कोरड्या विहिरीत टाकतात. या विहिरीमध्ये चुना आणि काळे मीठ असते. आठ ते दहा महिन्यांत विहिरीत त्याची पावडर तयार होते.