Ratan Tata : रतन टाटा यांचे मॅनेजर आणि गुडफेलोचे संस्थापक शांतनु नायडू याने नवीन टाटा सफारी एसयूव्ही खरेदी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे रतन टाटा यांनी स्वतः शांतुनने खरेदी केलेल्या एसयुव्हीची पाहणी केली. हा संपूर्ण अनुभव त्यांनी टीम-बीएचपीवर काही फोटोसह शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका फोटोत, रतन टाटा स्वत: त्यांच्या नेतृत्वाखाली नवीन उंची गाठणाऱ्या यां कंपनीची नवीन SUV कौतुकाने पाहताना दिसत आहेत.  शांतनुने या कारच नाव युकी असं ठेवलंय. , शंतनू नायडूने खरेदी केलेली टाटा सफारी पांढर्‍या रंगात अॅक्प्लिश्ड प्लस प्रकाराची आहे. “म्हणजे टाटा समुहातासोबत काम करताना मला निष्ठेची जाणीव आहे. पण तुम्हाला माहीत आहे की तुम्ही कधी कधी वाहन पाहता आणि तुम्हाला कळतं की ही खास आहे. प्रत्येक वेळी मी तिला पार्क करतो तेव्हा मी न चुकता मागे वळून पाहतो.” अशी प्रतिक्रिया नायडू याने टीम-बीएचपीच्या मंचावर लिहिले.


ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी, टाटा सफारीपूर्वी, शंतनू नायडू ‘रतन टाटांच्या ड्रीम कार’ टाटा नॅनो चालवत असत. शांतनुसाठी एसयूव्ही ही कार खरेदी करणे म्हणजे मोठी उडी आहे. पण या सध्या तो या कारचा सुखद अनुभव घेत आहे. त्याच्या पोस्टमध्ये, शांतनुने टाटा मोटर्स एसयूव्हीबद्दल त्याला आवडलेल्या अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी काही टिप्स देखील नमूद केली आहेत जिथे एसयूव्ही सुधारली जाऊ शकते.


रतन टाटा हे सर्वात प्रसिद्ध भारतीय अब्जाधीशांपैकी एक आहेत आणि त्यांचे मॅनेजर देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप लोकप्रिय आहेत. नवीन सफारीबद्दलची त्याची पोस्ट देशातील SUV उत्साही लोकांचे लक्ष वेधून घेत आहे कारण नायडू याने त्याच्या पदवीनंतर ऑटोमोबाईल डिझाईन अभियंता म्हणून पुण्यातील टाटा एल्क्सी येथे नोकरी पत्करली. त्यामुळे नेटिझन्सना त्याची मते विश्वासार्ह वाटत आहेत.