Ratan Tata And Diljit Dosanjh: देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी 9 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. राजकारणातील नेते, क्रीडा आणि चित्रपट क्षेत्रातील लोक, प्रत्येकजण त्यांना श्रद्धांजली वाहतो आहे. पंजाबी गायक दिलजीत दोसांझनेही जर्मनीत रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. सध्या गायक दिलजीत दोसांझ दिल-लुमिनाटी टूरवर आहे. देशभरात त्याच्या मैफिली होत असतात. लंडननंतर नुकतीच जर्मनीत त्याची मैफल झाली. यावेळी रतन टाटा यांच्या निधनाची बातमी समजताच दिलजीत दोसांझ याने कॉन्सर्ट मध्येच थांबवली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर दिलजीत दोसांझच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये जो स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहे. मात्र, त्याला त्याच्या टीमकडून रतन टाटा यांची बातमी मिळताच तो कॉन्सर्ट थांबवतो आणि प्रथम रतन टाटा यांना श्रद्धांजली वाटतो आणि म्हणतो, यावेळी, त्यांचे नाव आधी घेणे खूप महत्वाचे आहे. 


दिलजीत दोसांझने मध्येच कॉन्सर्ट थांबवली 


दिलजीत दोसांझचा हा व्हायरल व्हिडीओ एका यूजरने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो म्हणतो आहे की, तुम्हा सर्वांना रतन टाटाजींबद्दल माहिती आहे. आज त्यांचे निधन झाले आहे. आपल्या सर्वांकडून त्यांना श्रद्धांजली. आज त्यांचं नाव घेणं मला खूप गरजेचं वाटत होतं. कारण त्यांनी आयुष्यभर खूप मेहनत घेतली. मी त्यांच्याबद्दल जेवढे ऐकले आहे आणि वाचले आहे. त्याचबरोबर मी त्यांना कधीही कोणाबद्दल वाईट बोलताना कधीच पाहिले नाही. त्यांनी नेहमीच चांगले काम केले आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक जणांना खूप मदत देखील केली आहे. आज जर आपण त्यांच्या जीवनातून काही शिकू शकलो तर ते म्हणजे कठोर परिश्रम करणे. चांगले विचार करणे आणि एखाद्याला मदत करणे. 


पहा व्हिडीओ


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सध्या सोशल मीडियावर देखील दिलजीत दोसांझच्या या व्हिडीओचे प्रचंड कौतुक होत आहे. मोठ्या प्रमाणात त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी त्याच्या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तर काही चाहत्यांनी म्हटलं आहे की, तुम्ही ज्या प्रकारे कॉन्सर्ट अर्ध्यावरच थांबवून रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सध्या दिलजीत दोसांझ त्याच्या म्यूझिक टूरमध्ये व्यस्त आहे.