मुंबई : देशातील लोकप्रिय उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचा कोणता परिचय देण्याची गरज नाही. रतन टाटा यांच्यासोबत असलेला तरूण मुलगा शांतानु नायडू (Shantanu Naidu) यांचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. २८ वर्षात शांतानु नायडू बिझनेस इंडस्ट्रीत स्वतःच वेगळेपण निर्माण केलंय. अनेकांना ही उंची गाठायची असते पण शांतानूने कमी वयात एवढं यश संपादन केलंय. 


चर्चेपासून दूर असतो जिमी टाटा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चर्चांपासून खूप लांब असतात रतन टाटा यांचे छोटे भाऊ जिमी टाटा (Jimmy Tata). मुंबईच्या कुलाबा परिसरात राहणारे रतन टाटा यांचे भाऊ जिमी टाटा कायमच ग्लॅमर आणि चर्चांपासून दूर असतात. 


जिमी टाटा इतकं सामान्य आयुष्य जगत आहेत की, ते दोन खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहतात. मीडियापासून लांब असल्यामुळे त्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. 


अविवाहित आहेत जिमी टाटा 


रतन टाटा यांच्याप्रमाणे जिमी टाटा देखील अविवाहित आहेत. उद्योगपती हर्ष गोयंका (Businessman Harsh Goenka) यांनी बुधवारी रतन टाटा यांच्या भावाबद्दल ट्विटवरून माहिती दिली. 


त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, तुम्ही रतन टाटा यांचे लहान भाऊ जिमी टाटा यांना ओळखता का. कुलाबा परिसरात खूप लहान फ्लॅटमध्ये ते राहतात. त्यांना व्यवसायात रस नाही. ते स्क्वैशचे उत्तम खेळाडू आहेत. मला सतत हरवत असतात. 



जिमी टाटा हे रतन टाटा यांचे धाकटे भाऊ आहेत तर नोएल टाटा हे त्यांचे सावत्र भाऊ आहेत. 90 च्या दशकात निवृत्त होण्यापूर्वी जिमी टाटा यांनी टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांमध्ये काम केले. ते टाटा समूहातील कंपन्यांचे भागधारक आणि सर रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिमी टाटा हे मोबाईलचा देखील वापर करत नाही. वृत्तपत्रांच्या माध्यमातून देशाच्या आणि जगाच्या बातम्यांशी ते अपडेट राहतात.